त्याला मी पहिला …जवळुन ऐकला… त्याचा संवाद वाचला … त्याचे विचार मनाला भावले. म्हणूनच त्याच्या बद्द्ल थोडे लिहिण्याचा प्रयत्न करतो.
मंजुळ भारद्वाज एक उपजत वास्तववादी रंगकर्मी, दिग्दर्शक, लेखक, कवी आणि निर्माता पण … त्याची नाटकं ही सत्य घटनेवर आधारित, वास्तववादी, ध्येयवादी अशी वाटली. घडलेली घटना जशीच्या तशी समाजाच्या समोर मांडणे हाच त्याचा छंद … वास्तविक आजच्या जगात रंगकर्मी मार्फत ज्या कलाकृती समाजासमोर मांडल्या जातात त्या भडक स्वरुपात शृंगारिक रसात अवास्तक थोडे वास्तव व कल्पनेच्या भारुडावर रचलेले गल्लाभरू स्वरुपात मांडले जाते आणि त्यात श्रीमंती थाटच नव्हे तर त्यात आजचा कलाकारसुद्धा लोभापायी विकला जातो. वास्तविक सत्ता ही कलाकाराला नेहमी घाबरली पाहिजे. पण त्या तोडीचा कलाकार, दिग्दर्शक, लेखक असावा लागतो.
खरा कलाकार उच्चभ्रू श्रीमंत निर्मात्याच्या मोहोजाळात फसत नाही. आणि त्यांनी फसू पण नये … समाजात शोषण, अपप्रवृत्ती, जीवघेणी अंधश्रद्धा, भृणहत्या, शेतकऱ्यांची दैन्यावस्था, पर्यावरणाचा -हास, पाण्याच्या समस्या, स्वच्छतेच्या अभाव, नाही नाही ते आजार, कुपोषण, हुंडाबळी, न्याय, हक्क याची जाणीव कितीतरी गोष्टी आज दैनिक जीवनातच पाहायला मिळतात …
वरील सर्व बाबी खरा रंगकर्मी समाजासमोर बिनधास्त वृत्तीने ठेऊ शकतो. जेणेकरून समाजातील गुंडगिरी प्रवृत्तीवर जनमाणसातून दडपण येऊ शकले. मंजुळ भारद्वाज जी नाटक सादर करतो त्यात वास्तव आहे विद्रोह आहे.
कदाचित त्याच्या या नाटकाला आर्थिक अडचणीतून वाटचाल करावी लागत असेल. कोणतीही चांगली गोष्ट शून्यातून निर्माण होते. चांगल्या गोष्टी माणसावर बिंबवण्यास वेळ लागतो हे ही सत्य आहे पण काही काळाने समाजाला ही बाब लक्षात येईल. मंजुळ जे समाजाचे चित्रण दाखवतो ते खरे वास्तव आहे आणि त्याचीच आज मानवतेला गरज आहे.
भडक, शृंगारिक, लज्जास्पद, मादक, उन्मादक घटना समाजासमोर मांडून स्वतःच्या आर्थिक लाभासाठी उच्चभ्रू लोक देशाचे फार मोठे नुकसान करीत आहेत ते फार मोठे पाप आहे. त्यांच्या कलाकृतीतून बालमनावर, तरुण पिढीवर नव्हे ते संस्कार होत असून समाज किडलेल्या अवस्थेत जात आहे. भडक, गुंडगिरी, दबंगशाही यातून समाजाचे पतन तर होतच आहे आणि समाजाची मुल्य रसातळाला जात आहे. रोजच्या वाचण्यात येणा-या वर्तमानपत्रातील घटना हेच सुचवीत आहे.
कलानिर्मिती हि उच्चभ्रू लोकांच्या ताब्यात असून ते दिग्दर्शक, लेखक, कवी, संगीत वाल्यांना पाहिजे तशी कलाटणी देऊ शकतो जेणे करून त्याचा गल्ला तुडुंब भरेल. या गल्लाभरू उच्चभ्रू पाण्याला ध्येय, संस्कार, मुल्य याची मुळीच तमा नसते आणि अशा कलाकृती निर्माण करणा-या निर्मात्यांचे सुद्धा एक प्रकारचे षड्यंत्र आहे. एकावर एक ताण उत्सृंखल, घातक गोष्टी पैशाच्या जोरावर ते तरुणीच्या माथी मारून त्याच्या जीवनाची दिशा बदलून समाजाची वाईट दशा करायला मागेपुढे पाहत नाही. समाजात घातक प्रवृत्तीचे प्रदर्शन करणे हा सुद्धा एक प्रकारचा समाजद्रोहच आहे. पण आज समाज तिकडे लक्ष देत नाही ही देशाची शोकांतिका आहे. मंजुळ सारख्याचा प्रयत्न हा एक प्रकारचा खारीचा वाट वाटेल पण तो प्रेरक आहे मौलिक आहे. काळ त्याच्या कलेची दखल घेईल हे खात्रीपूर्वक ….
कोणत्याही दरोडेखोर बापाला आपला मुलगा दरोडेखोर झाला पाहिजे असे वाटत नाही. कोणत्याही जुगारी, चोर माणसाला आपला मुलगा जुगारी किंवा चोर झाला पाहिजे असे वाटत नाही… तेव्हा आपण आशा करू या … भावी पिढीतरी काल्पनिक अवास्तव घटनेपासून अलिप्त राहील. आशा करतो "नेहमीच सत्ता ही कलावंताना घाबरलीच पाहिजे" त्या दिवसाची आपण वाट पाहू या.
मंजुळ आणि सर्व कलाकारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा… सर्वाना नववर्ष दीर्घायुषी शांती सुखाचे जावो हीच प्रार्थना !
महादेव झिंगुजी गावंडे गुरुजी
Mobile - 9657985054
जन्मगाव वणी ता. चांदूर बाजार जि . अमरावती महाराष्ट्र
This article is written on 9 Jan 2015 at Shantivan , Panvel after experiencing
Theatre of relevance processes in 5 to 9 Jan 2015 Theatre of relevance
workshop held in Shantivan , Panvel .
No comments:
Post a Comment